Tuesday, November 25, 2014

दुःख हलके होत असते बोलण्याने

घेतात पक्षी उंच भरारी, पिंजरा जसा खोलण्याने।
तसेच दुःख हलके होत असते बोलण्याने ।।

आनंदाचा जसा पूर येतो
चेहऱ्यावर जसा नूर येतो
ढगाला जसे, ढग गाठतात
मनात जसे आभाळ दाटतात
पारिजात जसा फुलतो,तुझ्या येण्याने
तसेच, दुःख हलके होत असते बोलण्याने

रात्री दिवा कसा अगदी मंद असतो ।
तुझ्या प्रेमाचा, वेगळाच गंध असतो ।
हारलो नाही आपण, विस्कटलेले नाते शोधताना ।
कित्येक तास घालवले आपण, तारे मोज्ताना
नाती जशी, बहरत आहे तुझ्या गुंफण्याने
तसेच, दुःख हलके होत असते बोलण्याने

कालाचे कधी आपल्याल्या भान राहीले नाही ।
कालचे काही आप्त ,आपले , आज राहिले नाही ।
गेलेल्यांचे शोक मात्र, करायचे नाही आता ।
प्रण करूया, प्रेमा शिवाय जगायचे नाही आता ।
मन कसं हलकं होतं, डोळे भरून रड्ल्याने ।
तसेच, दुःख हलके होत असते बोलण्याने
©®राहुल फ़राज़ —

No comments:

Post a Comment