Tuesday, November 25, 2014

घेतलं असतं नाव टिंब टिंब च.......

जवळपास 20 वर्षा पूर्वी ची गोष्‍ट आहे त्‍याला ती फार आवडायची कदाचित तीला ही तो आवडायचा. कोणाच्‍या तरी लग्‍ना समारंभी त्‍याची भेट परत झाली, लग्‍नघरी जेवणाची तयारी झाली होती, कोणीतरी गलका केला की नाव घ्‍या नाव घ्‍या. नवरा मुलानी मुलीचे व मुलीनी मुलाचे नाव घेतले एक उखाण्‍याच्‍या रूपात. मग तर उखाण्‍यांची पैजच लागली की कोण कोण उखाणा घेउ शक्‍तो किंवा घेउ शकते. अता त्‍या मुलावर ही उखाणा घ्‍यायची वेळ आली व तीच्‍या मनांत सारखी हुर हुर की अता हा माझं नाव घेतो की काय व मग तीची फजती होते की काय. त्‍याने ही फार शिताफी ने लगेच एक उखाणा तयार केला व सर्वांना तो ऐकवला. पेश आहे तो उखाणा तुमच्‍या साठी

आला असतां शब्‍दांना मान तुमच्‍या
महफिल ही सजलीं असती
घेतलं असतं नाव ............. (टिंब टिंब चं)
ती जर समोर बसली असती

काळांतरानें दोघांचे लग्‍न झाले. कसे झाले त्‍याची पण एक कहाणी आहे पण ती नंतर केव्‍हा तरी सांगीन. तर परत त्‍याच घरी तेच लग्‍नाचे निमित्‍त तशीच मैहफिल तीच जेवणाची पंगत परत तेच दोघं, पण यावेळी वेगळ्या रूपात आमोर-समोर बसलेले.
त्या मुलाने एक कविता त्‍या महफिलीत ऐकवली ती अशी होती.......

तूच होती.........

माझ्या स्‍वप्‍नांत, मनांत
दुःखाच्‍या क्षणांत....तूच होती
अहो रात्र , काळजाच्‍या पात्रात
डोळे भरून आल्‍यावर.. पापण्‍यांच्‍या पात्रात..... तूच होती
तूच होती.... आयुष्‍यात मला
साथ द्यायला तयार
जिवनाच्‍या, उन पावसात
छत्री सारखी, अफाट....तूच होती
तूच होती.... बेधुंद क्षणात, दुःखाच्‍या रानात
सुखाच्‍या पावसा सारखी
भिजलेल्‍या मनांत.... तूच होती
समुद्रा काठी लाटांची, वेगळीच चढाओढ
जशी... प्रेमाच्‍या घरट्या साठी
तुझी केलेली तडजोड
तुझ्या तडजोडीनें, येणार
नवीन पहाट होती
तुझ्या माझ्या प्रेमाची जणु
वेगळीच नदी वाहत होती
घरात येणार्या लक्ष्‍मी ची
पावले ती तूच होती.......

झाली वर्षे 15 जरी , वेळ तेव्‍हा ही अशीच होती
अशीच सजली हेाती मैफिल
आणि, ‘’टिंब टिंब ती तूच होती’’
टिंब टिंब ती तूच होती........
©®राहुल फ़राज़

परत उखाणे म्‍हणा ची फरमाईश परंतु यावेळेस काय होता तो उखाणा.

आला आता शब्‍दांना मान तुमच्‍या
महफिल ही सजली आहे
सोनू आणि छोटू च्‍या संसारात अता
टिंब टिंबा ची काय गरज आहे........

No comments:

Post a Comment