ये आता परत......
बरेच दिवस झाले
तुझ्याशी बोलणं झालं नाही
हल्ली तारे मोजत, राहतो नं
स्वप्नांना ही माहित नाही
काय झालंय
सगळीकडे फक्त काळं दिसतयं
रंग उडाला असेल, कदाचित
आपल्या प्रेमा सारखा
अंधार पसरलाय सगळीकडे
वयामानाने........
डोळे सुध्दा मंदावलेय
ऐकतेयं......
जेव्हा तुझी आठवणं येते नं
वेळ कसा निघुन जातो
कळतचं नाही....
जेव्हा तू माझ्या या
फोटो ची धूळ साफ करतेस नं
तेव्हा कुठे तुला, पाहतां येतं
तुझी सुध्दा कंबर....
वाकली आहे आता....
आणखी किती दिवस.......
आपल्या माणसांत
परक्या सारखं रहायचं
माझ्या टुटक्या खुर्चीवर
टुटलेल्या नांत्याचं
ओझं घेउन, नुसती बसली असते
ये आता परत.......
परत मिळून...
भूतकाळाची पानें मागे सारूया
आणी परत जाउ या
त्या पाना पर्यंत.....
जेव्हा आपण पहिल्यांदा
भेटलों होतो
ये आता परत...... ये आता परत.......
(परिकल्पना आणि संवाद)
राहुल उज्जैनकर 'राहुल'
(( माझ्या एका हिंदी कवितेचं मराठी रूपांतरण , लिंक खाली दिली आहे ))
http://rworld23.blogspot.in/2013/07/blog-post.html
No comments:
Post a Comment