Wednesday, December 12, 2012

जरी पराधीन आहे,जगती जन्‍म मानवाचा......


जरी पराधीन आहे,जगती जन्‍म मानवाचा......

घेई जन्‍म बाळ,त्‍यासी
न कळे धर्म कैचा
कळे ना जात कैची, न भाषा
जन्‍मला माय पोटी
ओळखी माय भाषा
जरी पराधीन आहे,जगती जन्‍म मानवाचा......
जाणतो हा सर्व मर्म
बंधनें ही मिथ्‍या सारी
तरीं, दंभ जपूनी आपले
करितो हा अहं भारी
स्‍वयं कां रंगविले तू...?
स्‍वप्‍न आपले राजकुमारी
तुटले नाते, उरली न कुणाची
कां, छळियले मज नाना प्रकारी....?
अहं सर्व, अहं ब्रम्‍ह
असा कसा हा गुण मानवाचा....?
जरी पराधीन आहे,जगती जन्‍म मानवाचा......
राहुल उज्‍जैनकर 'फ़राज़'

2 comments:

 1. उत्तम । दैव चैवात्र पंचमं ।।

  ReplyDelete
  Replies
  1. विविधाश्च पृथक चेष्टा दैवं चैवात्र पंचमं
   भिन्न-भिन्न चेष्टाएँ (प्रयत्न) आणी पांचवां दैव (भाग्य).

   अगदी बरोबर म्‍हणता आहात तुम्‍ही.......

   धन्‍यवाद आपल्‍या स्‍तुती साठी

   सादर

   Delete