आज तुझाा पाठलाग केला
तुला सुध्दा कळलं नसेल...
पवारांच्या.... मळ्यात
बाजीरावांच्या..... तळ्यात
जुहु बीच च्या....., त्या जुन्या
लेम्पोस्ट च्या जवळ....
प्रत्येक जागी.......
माझा आवडता, तुझा तो
गुलाबी रंगाचा सूट......
त्यात तू, फूलराणीच दिसायची......
आज ही दिसत होती.....,
तशीच.....
.
मग तू घरी परतलीस
अण् मी ही.....
मला मात्र आत येता आलं नही
तुझ्या घराचं,
कुंपण आडव आलं......
आठवणींना मात्र...
कसलेही कुंपण
आडवं येत नाही
कुणी त्यांना
अडवूच शकत नाही
पण.......
गरीबाला इतकं उंच कुंपण
सहजा-सहजी कसे
पार करता येणर ?
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
©® राहुल उज्जैनकर 'राहुल'