ओठांवरती ठसा ओठांचा , उमटुन गेला असेल कदाचित
तुझे सौंदर्य नज़रे न टिपता, ओठांनी टिपले असेल कदाचित
अंधर नव्हता इतुका ,जेव्हा, तू बिलगली मम ह्रदयाशी
चंद्र नव्हता चावट त्यानें, डोळे मिटले असेल कदाचित
मी भ्रमर तुझ्या सौंदर्याचा, त्या भ्रमराशी काय युति
तुझे अधरामृत, तो भ्रमर, प्राशून गेला असेल कदाचित
तूच मेनका, तूच रंभा, तूच मदालसा असेल कदाचित
तुझ्याच मादक गंधानी मी, मोहून गेला असेल कदाचित
©®राहुल उज्जैनकर ‘राहुल’
No comments:
Post a Comment