Wednesday, October 23, 2013

कोजागिरी दिन

दिनांक 19 ओक्‍टोबर 2013 रोजी मराठी संस्‍कृती मंडळ, जानकी नगर, येथे ‘’कोजागिरी दिन’’ चे आयोजन करण्‍यात आले, या कार्यक्रमा अंतर्गत श्रीमती अरूणा परांजपे व साथी यांनी सुमधुर गीतांची प्रस्तुती दिली, तबल्‍यावर संगत केली प्रसिध्‍द तबला वादक श्री रानडे जी, हारमोनियम वर श्री चांदोरकर जी, वायलिन वर श्री कुंटे जी, कार्यक्रमाच्‍या प्रारंभी सर्वांचे स्‍वागत करण्‍यात आले व नंतर कार्यक्रमास सुरवात करण्‍यात आली, कार्यक्रमात उपस्थित श्रोत्‍यांनी भावगीत, नाट्यगीत एवं भक्तिगीतांचा भरपूर आनंद घेतला.

आयोजनास विशेष निर्देशन व सहयोग अध्‍यक्ष डॉ. श्री शरद महाजन व सचिव श्री विजय फणसळकर यांचे होते.

सहयोगी कार्यकर्ते होते.......
श्री विजय परेतकर , नारायण तेलंग, संजय आपटे, प्रकाश वाते, मनीष गुजराती, सुहास कोरडे, आर.के. खेर, धनंजय बेहरे, गोविन्‍द पांडे, संदिप रिसबुड, सुधीर कळसकर, सचिन दाभाडे, दिलीप जोशी, प्रमोद वडसमुद्रकर

No comments:

Post a Comment