Monday, February 27, 2012

सांझ गारवा

सांझ गारवा - अंश क्रमांक 1 (संध्‍याकाळ जवळ आली की माझ असं होतं)

सांझ गारवा - अंश क्रमांक 2 (सळसळणारा वारा अन सोन पिवळया रानात)

सांझ गारवा - अंश क्रमांक 3 ( आता तुला सगळं जुनं आठवेल की नाही कुणास ठाउक )

सांझ गारवा - अंश क्रमांक 4
अशीच यावी वेळ एकदा, स्‍वप्‍नी देखील नसताना
असेच घडावे अवचित काही, तुझया समीप मी असताना

अश्‍याच एका संध्‍याकाळी, एकांताची वेळ अचानक
जवळ नसावे चिटट पाखरू, केवळ तुझी नी माझी जवळीक

संकोचाचे रेशीम पर्दे, हा हा म्‍हणता विरून जावे
समय सरावा मंद गतीने, अन प्रितीचे सूर जुळावे

मी मागवे तुझिया पाशी, असे काहीसे निघताना
उगीच करावे नको नको तू, हवे हवे से असताना

शब्‍दावाचून तूला कळावे, गूज मनी या लपलेले
मुक्‍त पणी तू उधळून द्यावे, जन्‍म भरीचे जपलेले ......
(सांझ गारवा यां सीडी मधील कवितेचा अंश)

No comments:

Post a Comment