आईस पाईस खेळणं आता थांबवायला हवं
तुझं माझं भांडण अता थांबवायला हवं
हा संसार फक्त माझा नाही, हा संसार फक्त तुझा नाही
घरटं हे आपल्या दोघांच, सर्वच आपले कुणी दुजा नाही
मी पण आपल्यातले अता, सर्व गळायला हवं
तुझं माझं भांडण अता थांबवायला हवं
खुप फिरला मी माझ्या हौसे साठी
खुप फिरली तू तुझ्या हौसे साठी
संसाराची गाडी मात्र जागेवरच राहिली
एकाच दिशेने दोन्ही चाकं अता फिरायला हवं
तुझं माझं भांडण अता थांबवायला हवं
90 टक्के मार्क्स तर मुलं माझ्यावर गेलीये
कधी भांडली शाळेत, तर बापावर गेलीये
अहं च्या जाळ्यात पिलांना गुरुफटायचं नसतं
नाते विस्कटण्या आधी सावरायला हवं
तुझं माझं भांडण अता थांबवायला हवं
राहुल उज्जैनकर 'राहुल'