तुझे ते गोड हासणे
तो नखरा, ते धावपळी चे खेळ
तुझे ते हसतां-हसतां रडणे
मग माझे हात
तुझया डोळया पुढे येताच
तुझे ते गोड हासणें
त्या उंच आकाशाच्या गोष्टी
ते समुद्राकाठी घालवलेले
कित्येक तास
त्या मावळत्या सूर्या कडे
एकटक पाहत राहणे
अगं, हे सगळं विसरतां येईल कां ?
आज आपल्याला
वेगळे होवून
कित्येक वर्षे झाली आहे
पण ................
अजुनही असेच वाटते
की
जशी कालचीच गोष्ट होती
तू धावत आलीस
अन्
आपण समुद्राकाठी गेलो
तू रडत होतीस
कारण .........
वडिलांची बदली झाली होती
तुझया
आज शेवटची भेट होती
तुझी
माझी
असाही दिवस येईल
कधी कल्पना सुध्दा केली नव्हती
कधी कल्पना सुध्दा केली नव्हती
आपल्या प्रेमाच्या पाखरांना
पंख सुध्दा फुटले नव्हते
पण .......
नियती पुढे कोणाची चालली आहे
आज ...............
तुझा लग्न समारंभ
सुखाने पार पडलां असेल
शेवटदा तुला पहायचं होतं
पण ...............
धाडस झालं नाही माझं
अगं
मी मनाचा ऐवढा मोठा नाहीये
मला, त्या पूर्ण न झालेल्या स्वप्नांचा
आज ही, हेवा वाटतोयं
हे सगळं विसरतां येईल कां ?
अगं, हे सगळं विसरतां येईल कां ?
अगं, हे सगळं विसरतां येईल कां ?
कल्पना व संवादः राहुल उज्जैनकर ''फराज''
No comments:
Post a Comment