Showing posts with label मराठी कविता. Show all posts
Showing posts with label मराठी कविता. Show all posts

Wednesday, July 20, 2022

मनें आपोआप जुळतात

आपुलकी ठेवावी लागते, अन्तरमनात
मने आपोआप जुळतात......
संवेदना पाहिजे माणसाच्या, हृदयात
वेदना आपोआप कळतात......
जिव्हाळा असावा लागतो, माणसात
नाती आपोआप टिकतात.... 
स्व. चा त्याग करावा लागतो, जीवनात
आप्तजन आपोआप मिळतात.....
*मुळात, संस्कार पाहिजेत, माणसात*
*माणुसाकि चे गुण आपोआप कळतात....*
©®राहुल फ़राज़

Thursday, July 02, 2015

बरेच दिवसात

बरेच दिवसात
आज तुझाा पाठलाग केला
तुला सुध्‍दा कळलं नसेल...
पवारांच्‍या.... मळ्यात
बाजीरावांच्‍या..... तळ्यात
जुहु बीच च्‍या....., त्‍या जुन्‍या
लेम्‍पोस्‍ट च्‍या जवळ....
प्रत्‍येक जागी.......
माझा आवडता, तुझा तो
गुलाबी रंगाचा सूट......
त्‍यात तू, फूलराणीच दिसायची......
आज ही दिसत होती.....,
तशीच.....
.
मग तू घरी परतलीस
अण् मी ही.....
मला मात्र आत येता आलं नही
तुझ्या घराचं,
कुंपण आडव आलं......
आठवणींना मात्र...
कसलेही कुंपण
आडवं येत नाही
कुणी त्‍यांना
अडवूच शकत नाही
पण.......
गरीबाला इतकं उंच कुंपण
सहजा-सहजी कसे
पार करता येणर ?
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
©® राहुल उज्‍जैनकर 'राहुल'

Friday, February 27, 2015

ओठां‍नी टिपले असेल कदाचित

ओठांवरती ठसा ओठांचा , उमटुन गेला असेल कदाचित
तुझे सौंदर्य नज़रे न टिपता, ओठां‍नी टिपले असेल कदाचित

अंधर नव्‍हता इतुका ,जेव्‍हा, तू बिलगली मम ह्रदयाशी
चंद्र नव्‍हता चावट त्‍यानें, डोळे मिटले असेल कदाचित

मी भ्रमर तुझ्या सौंदर्याचा, त्‍या भ्रमराशी काय युति
तुझे अधरामृत, तो भ्रमर, प्राशून गेला असेल कदाचित

तूच मेनका, तूच रंभा, तूच मदालसा असेल कदाचित
तुझ्याच मादक गंधानी मी, मोहून गेला असेल कदाचित
©®राहुल उज्‍जैनकर ‘राहुल’

Saturday, February 21, 2015

भावनेला वाहू द्यायचे

एका लेखकासाठी कलम (लेखनी) हेच त्‍याचे शस्‍त्र असते,
याच भावनेंने मी ही कविता लिहायचा प्रयत्‍न
केला आहे.......

पुन्‍हा घ्‍यायचे शस्‍त्र हातात आणि, भावनेला वाहू द्यायचे
आहे जो वरी श्‍वास श्‍वासात, प्रयाण असेच चालू द्यायचे

किती रम्‍य नयन तुझे, दोन होड्या सागरावरी
तन किनारा शोधती, मन हे प्रेमा बुडले जरी
मोगरा तू, तूच चाफाा, स्‍वये भ्रमर होवू द्यायचे
पुन्‍हा घ्‍यायचे शस्‍त्र हातात आणि, भावनेलावाहू द्यायचे

तुझी नज़र तुझे कटाक्ष, दोन खळ्या त्‍या गालावरी
मदालसा जणु नृत्‍य करते, ह्दयाच्‍या तालावरी
सैरा-वैरा मनांस आता, असेच वाहू द्यायचे...
पुन्‍हा घ्‍यायचे शस्‍त्र हातात आणि, भावनेला वाहू द्यायचे

रेशमी तो स्‍पर्श तुझाा, आठवितो मम किती
असेल जरी हा चंद्र शीत, दाखवितो तम किती
चांदण्‍या रात्रीत नेत्र, असेच ओले होवू द्यायचे
पुन्‍हा घ्‍यायचे शस्‍त्र हातात आणि, भावनेला वाहू द्यायचे

तू बिलगता अशी अचानक, माझ्यात मी न राही मात्र
शताका नूं शतके ओसरावी, पण न सरावी ही एक रात्र
या मृगाच्‍या सरी साठी, स्‍वतःला चातक होवू द्यायचे
पुन्‍हा घ्‍यायचे शस्‍त्र हातात आणि, भावनेला वाहू द्यायचे
राहुल उज्‍जैनकर ‘’राहुल’’

लिहा ओळीवर कविता - भाग १२४ - पुन्हा घ्यायचे शस्त्र हातात आणि - या उपक्रमात माझा सहभाग Marathi Kavita - मराठी कविता समूह या गुप साठी

Wednesday, January 14, 2015

आईस पाईस खेळण आता थांबवायला हवं

आईस पाईस खेळणं आता थांबवायला हवं
तुझं माझं भांडण अता थांबवायला हवं

हा संसार फक्‍त माझा नाही, हा संसार फक्‍त तुझा नाही
घरटं हे आपल्‍या दोघांच, सर्वच आपले कुणी दुजा नाही
मी पण आपल्‍यातले अता, सर्व गळायला हवं
तुझं माझं भांडण अता थांबवायला हवं

खुप फिरला मी माझ्या हौसे साठी
खुप फिरली तू तुझ्या हौसे साठी
संसाराची गाडी मात्र जागेवरच राहिली
एकाच दिशेने दोन्‍ही चाकं अता फिरायला हवं
तुझं माझं भांडण अता थांबवायला हवं

90 टक्‍के मार्क्‍स तर मुलं माझ्यावर गेलीये
कधी भांडली शाळेत, तर बापावर गेलीये
अहं च्‍या जाळ्यात पिलांना गुरुफटायचं नसतं
नाते विस्‍कटण्‍या आधी सावरायला हवं
तुझं माझं भांडण अता थांबवायला हवं
राहुल उज्‍जैनकर 'राहुल'

Tuesday, November 25, 2014

दुःख हलके होत असते बोलण्याने

घेतात पक्षी उंच भरारी, पिंजरा जसा खोलण्याने।
तसेच दुःख हलके होत असते बोलण्याने ।।

आनंदाचा जसा पूर येतो
चेहऱ्यावर जसा नूर येतो
ढगाला जसे, ढग गाठतात
मनात जसे आभाळ दाटतात
पारिजात जसा फुलतो,तुझ्या येण्याने
तसेच, दुःख हलके होत असते बोलण्याने

रात्री दिवा कसा अगदी मंद असतो ।
तुझ्या प्रेमाचा, वेगळाच गंध असतो ।
हारलो नाही आपण, विस्कटलेले नाते शोधताना ।
कित्येक तास घालवले आपण, तारे मोज्ताना
नाती जशी, बहरत आहे तुझ्या गुंफण्याने
तसेच, दुःख हलके होत असते बोलण्याने

कालाचे कधी आपल्याल्या भान राहीले नाही ।
कालचे काही आप्त ,आपले , आज राहिले नाही ।
गेलेल्यांचे शोक मात्र, करायचे नाही आता ।
प्रण करूया, प्रेमा शिवाय जगायचे नाही आता ।
मन कसं हलकं होतं, डोळे भरून रड्ल्याने ।
तसेच, दुःख हलके होत असते बोलण्याने
©®राहुल फ़राज़ —

घेतलं असतं नाव टिंब टिंब च.......

जवळपास 20 वर्षा पूर्वी ची गोष्‍ट आहे त्‍याला ती फार आवडायची कदाचित तीला ही तो आवडायचा. कोणाच्‍या तरी लग्‍ना समारंभी त्‍याची भेट परत झाली, लग्‍नघरी जेवणाची तयारी झाली होती, कोणीतरी गलका केला की नाव घ्‍या नाव घ्‍या. नवरा मुलानी मुलीचे व मुलीनी मुलाचे नाव घेतले एक उखाण्‍याच्‍या रूपात. मग तर उखाण्‍यांची पैजच लागली की कोण कोण उखाणा घेउ शक्‍तो किंवा घेउ शकते. अता त्‍या मुलावर ही उखाणा घ्‍यायची वेळ आली व तीच्‍या मनांत सारखी हुर हुर की अता हा माझं नाव घेतो की काय व मग तीची फजती होते की काय. त्‍याने ही फार शिताफी ने लगेच एक उखाणा तयार केला व सर्वांना तो ऐकवला. पेश आहे तो उखाणा तुमच्‍या साठी

आला असतां शब्‍दांना मान तुमच्‍या
महफिल ही सजलीं असती
घेतलं असतं नाव ............. (टिंब टिंब चं)
ती जर समोर बसली असती

काळांतरानें दोघांचे लग्‍न झाले. कसे झाले त्‍याची पण एक कहाणी आहे पण ती नंतर केव्‍हा तरी सांगीन. तर परत त्‍याच घरी तेच लग्‍नाचे निमित्‍त तशीच मैहफिल तीच जेवणाची पंगत परत तेच दोघं, पण यावेळी वेगळ्या रूपात आमोर-समोर बसलेले.
त्या मुलाने एक कविता त्‍या महफिलीत ऐकवली ती अशी होती.......

तूच होती.........

माझ्या स्‍वप्‍नांत, मनांत
दुःखाच्‍या क्षणांत....तूच होती
अहो रात्र , काळजाच्‍या पात्रात
डोळे भरून आल्‍यावर.. पापण्‍यांच्‍या पात्रात..... तूच होती
तूच होती.... आयुष्‍यात मला
साथ द्यायला तयार
जिवनाच्‍या, उन पावसात
छत्री सारखी, अफाट....तूच होती
तूच होती.... बेधुंद क्षणात, दुःखाच्‍या रानात
सुखाच्‍या पावसा सारखी
भिजलेल्‍या मनांत.... तूच होती
समुद्रा काठी लाटांची, वेगळीच चढाओढ
जशी... प्रेमाच्‍या घरट्या साठी
तुझी केलेली तडजोड
तुझ्या तडजोडीनें, येणार
नवीन पहाट होती
तुझ्या माझ्या प्रेमाची जणु
वेगळीच नदी वाहत होती
घरात येणार्या लक्ष्‍मी ची
पावले ती तूच होती.......

झाली वर्षे 15 जरी , वेळ तेव्‍हा ही अशीच होती
अशीच सजली हेाती मैफिल
आणि, ‘’टिंब टिंब ती तूच होती’’
टिंब टिंब ती तूच होती........
©®राहुल फ़राज़

परत उखाणे म्‍हणा ची फरमाईश परंतु यावेळेस काय होता तो उखाणा.

आला आता शब्‍दांना मान तुमच्‍या
महफिल ही सजली आहे
सोनू आणि छोटू च्‍या संसारात अता
टिंब टिंबा ची काय गरज आहे........

सरड़ा (प्रयास 2)

रंग बदलतोय
सरडा
झाडावर बसलेला

दाताहुन ही जास्त भयावह आहे
त्याचा रंग
हिरव्या पानांन मध्ये हिरवा होऊन जातो
जमीनी पर्यन्त येता येता
धुरकट

पोट भरले आहे, त्याचे
अता, घरी परततोय सरडा
सध्या, सन्ध्याकाळ चे पाच वाजलेय
कुणास ठाऊक
कोणत्या रंगात
प्रेम करेल आपल्या मादी ला
कुणास ठाउक
कोणत्या रंगात, प्रेम करेल
आपल्या लेकरांना
कुणास ठाउक, कोणत्या रंगात
परत, घरी येतोय सरडा
............... परत, घरी येतोय सरडा
©®राहुल फ़राज़
(चुक निदर्शनास आणल्‍या बद्दल आभार अलकनंदा साने मावशी)
श्री मणि मोहन मेहता यांच्या कवितेचा मराठी अनुवाद ।।
मराठी काव्य समूह वर आयोजित अनुवाद प्रतियोगिता क्रमांक 34 साठी लीहलेली ।।

ये आता परत.....

ये आता परत......
बरेच दिवस झाले
तुझ्याशी बोलणं झालं नाही
हल्‍ली तारे मोजत, राहतो नं
स्‍वप्‍नांना ही माहित नाही
काय झालंय
सगळीकडे फक्‍त काळं दिसतयं
रंग उडाला असेल, कदाचित
आपल्‍या प्रेमा सारखा
अंधार पसरलाय सगळीकडे
वयामानाने........
डोळे सुध्‍दा मंदावलेय
ऐकतेयं......
जेव्‍हा तुझी आठवणं येते नं
वेळ कसा निघुन जातो
कळतचं नाही....
जेव्‍हा तू माझ्या या
फोटो ची धूळ साफ करतेस नं
तेव्‍हा कुठे तुला, पाहतां येतं
तुझी सुध्‍दा कंबर....
वाकली आहे आता....
आणखी किती दिवस.......
आपल्‍या माणसांत
परक्‍या सारखं रहायचं
माझ्या टुटक्‍या खुर्चीवर
टुटलेल्‍या नांत्‍याचं
ओझं घेउन, नुसती बसली असते
ये आता परत.......
परत मिळून...
भूतकाळाची पानें मागे सारूया
आणी परत जाउ या
त्‍या पाना पर्यंत.....
जेव्‍हा आपण पहिल्‍यांदा
भेटलों होतो
ये आता परत...... ये आता परत.......
(परिकल्‍पना आणि संवाद)
राहुल उज्‍जैनकर 'राहुल'

(( माझ्या एका हिंदी कवितेचं मराठी रूपांतरण , लिंक खाली दिली आहे ))
http://rworld23.blogspot.in/2013/07/blog-post.html

कविता असावी तुझ्या सारखी

कविता असावी तुझ्या सारखी
——***——***——***——
तो – कागं ?, कविता म्‍हणजे काय गं ?
ती – कविता ??
अरे, जे मी लिहिते न, ती कविता. तुला नाही आवडत ?
तो - नाही गं, कविता अशी नको
जशी तू लिहिते. कविता अशी नसते
ती - अशी नसते ?
मग, कशी असते ?
कशी असायला हवी ?
तो - अगं, कविता न
निरागस असायला हवी
प्रेमळ असली पाहिजे
कविता असावी, दव-बिंदु सारखी
कोजागिरीच्‍या चंद्रा सारखी
दिवाळी च्‍या पाहाटे सारखी
थंड-गार हवे सारखी
कविता असावी
मोगराच्‍या कळी सारखी
तुझ्या गालावरच्‍या खळी सारखी
.
.
कविता असावी
कोवळ्या उन्‍हा सारखी
पावसानी सारवलेल्‍या वनां सारखी
डांगरा आड लपलेल्‍या सूर्या सारखी
गणपित ला वाहिलेल्‍या दूर्वां सारखी
कविता आसावी
समुद्राच्‍या लाटांसारखी
तुझ्या गुलाबी ओठां सारखी
कविता असावी
पावसाळ्याच्‍या पावसां सारखी
गड-गडणर्या ढगा सारखी
भावगीताच्या गोडी सारखी
नदीतल्‍या होडी सारखी
.
.
कविता असावी
रातराणीच्‍या गंधा सारखी
तुझ्या-माझ्या रेशमीबंधा सारखी
कविता असावी तुझ्या सारखी
तुझ्या माझ्या प्रेमा सारखी
तुझ्या माझ्या प्रेमा सारखी
©®राहुल उज्‍जैनकर ''राहुल''
Dated :05-11-2014

सरड़ा (प्रयास 1)

सरडा ।।
-*-*-*-*-*-*-
विषारी जगात, विषारी झालेला
आपल्या सारख्या
विषारी लोकांत..... मानाचं
स्थान गाठलेला
सरडा......
माणसात येटा येता
मदोन्मत्त होऊन जातो
सरडा....
त्याच्या विषा सारखीच
घातक आहे, त्याची वासना
माद्यांना ओर्बाडून टाकायाची वृत्ति
आश्रिताना, चरण रज़ करणारी दंम्भिकता
कुणास ठाऊक
आज कोणता कहर कोसळेल
आपल्या मादी वर
किती पाशविकता,झेलणार
त्याचे, आश्रित
बरेच वर्षांत शांत झालेल्या
कीनार्यावर.....
कहर माजणार आहे आज
उध्वस्थ होणार। आहे, प्रत्येक काठ
पूर येणार आता...
उद्वेगाचा.......
कारण ??????
बरेच वर्षांनी
आज, पुन्हा
घरी परत येतोय सरडा
आज, घरी परत येतोय सरडा
©®राहुल उज्जैनकर "राहुल"
((श्री मणि मोहन जी की हिंदी कविता "गिरगिट" का भावानुवाद करने का एक विफल प्रयास ।))

चालू लाग की... फार काही, अजून सावरायचं राहलय

चालू लाग की... फार काही, अजून सावरायचं राहलयं
पीक अजून उन्हाचे, कापायचं राहलयं
.
प्रेमाचा चंद्र हा ठेवु तर मी ठेवू कुठे ?
माड़ीवरुन अमावस्येची रात्र, अजून काढायचं राहलयं
चालू लाग.....
.
तू म्हणतेस्, सोबत प्रेमानी,स्वपनांचे घरटे बांधु
तरी सुद्धा, आयुष्याच्या परीक्षा,अजून देण्याचं राहलयं
चालू लाग की......
.
आज, तू माझी , मी तुझा, झालो जरी
आयुष्याचं, मोठं स्टेशन ,अजून गाठायचं राहलय
चालू लाग की.........
©®राहुल उज्जैनकर "राहुल" —

Friday, August 16, 2013

तुझ्याशीच तुला मागायचं होतं

तुला बरचं काही सांगायचं होतं
खरंतर तुझ्याशीच तुला मागायचं होतं
तू जवळ असली, की...........
सर्व काही विसरायला होतं
मग.......
तुझ्याशी बोलणं, तुला बरचं काही सांगणं
राहुन जातं.....
जसं तू जवळ नसतानां,
पापण्‍यांतून पाणी वाहून जातं |
हल्‍ली.....
तुझ्याशी बोलायला, शब्‍दच सुचत नाहीं
तुझ्या शिवाय तनां-मनांत, कोणी सुध्‍दा उरत नाहीं
मनाला एक वेगळीच, हुर-हुर......
की....... तुझं मनं माझ्या साठी झुरत नाहीं
मलां सगळं कळतयं गं,
पण मनं तरीही वळणार नाही,
अंतर हे आपल्या मधले,
कधी सुध्‍दा गळणार नाहीं...............
जगात चाली-रिती बदलल्‍यात, पण......
घरच्‍यांना, पटनार नाहींत,
तुझीच हाईल दशा, मग....
जात्‍यातील धान्‍यां सारखी, पण मी आता ठरवलंय,
आपल्‍या स्‍वप्‍नांना अडवलंय, फक्‍त एकदा...........
एकदाच...................
तुला भेटायचं होतं.................
तुला बरचं काही सांगायचं होतं
खरंतर.................. तुझ्याशीच तुला मागायचं होतं
खरंतर................तुझ्याशीच तुला मागायचं होतं
राहुल उज्‍जैनकर ‘फ़राज़’

Saturday, August 10, 2013

हल्‍ली- वाट चुकलेले घरी परत वळतात कुठे

माझ्या मुक्‍या भावनां तुला कळतात कुठे

हल्‍ली, स्‍वप्‍नें पण यथार्थात घडतात कुठे


माझे अश्रु, डोळ्यात तुझ्या येणे शक्‍य नाही

हल्‍ली, दगडांना सुध्‍दा  पाझर फुटतात कुठे


तुझ्या जाता, कितीतरी वर्षे, वर्षां माघून निघून गेली

हल्‍ली, 'राहुल' सारखं, लोकं आठवणीं जपतात कुठे


तुझ्या काळजीत, काळजाचा ठोका सुध्‍दा चुकतो

पण,हल्‍ली- वाट चुकलेले घरी परत वळतात कुठे

राहुल उज्‍जैनकर फ़राज़

Wednesday, December 12, 2012

जेव्‍हा शब्‍द सुचत नाहीं..

जेव्‍हा शब्‍द सुचत नाहीं.............

आवरता येत नाही भावनांचा वेग
नियतीचा तोल
डोळ्रयांतील अश्रुंचा वेग
पावसाच्‍या सरी कोसळतात
पूर येतो पापण्‍यांच्‍या काठेला
सर्व काही धुकं, होत जातं
मन हे शब्‍दां वाचून मुकं होत जातं
जेव्‍हा शब्‍द सुचत नाहीं.............
डोळ्रयांतील पाण्‍याला
कोणीच झेलत नाही
बांध फुटतो,हुंदके येतात
मन तरी वळत नाहीं
कुणाला ही माझी व्‍यथा
कशीच कां कळत नाही
कुण्‍याच्‍याही मनांत
पश्‍चातापाचे अंकुर ही फुटत नाहीं
जेव्‍हा शब्‍द सुचत नाहीं.............
रोज रात्री तुझीच आठवण
तुझ्याच कुशी साठी
माझं..हरवलेलं बालपण
शोधत राहते..चंद्रा बरोबर
तो ही एकटाच असतो
काही सुध्‍दा बोलत नाहीं
जुणु त्‍याला ही माझ्या
भावना काही कळत नाहीं
किंवा...शब्‍दां वाचून
बोलावं काय
त्‍याला ही सुचत नाहीं
अशीच होते दशा
आपली, जेव्‍हा शब्‍द सुचत नाही
     जेव्‍हा शब्‍द सुच नाहीं.............
राहुल उज्‍जैनकर 'फ़राज़' 

जरी पराधीन आहे,जगती जन्‍म मानवाचा......


जरी पराधीन आहे,जगती जन्‍म मानवाचा......

घेई जन्‍म बाळ,त्‍यासी
न कळे धर्म कैचा
कळे ना जात कैची, न भाषा
जन्‍मला माय पोटी
ओळखी माय भाषा
जरी पराधीन आहे,जगती जन्‍म मानवाचा......
जाणतो हा सर्व मर्म
बंधनें ही मिथ्‍या सारी
तरीं, दंभ जपूनी आपले
करितो हा अहं भारी
स्‍वयं कां रंगविले तू...?
स्‍वप्‍न आपले राजकुमारी
तुटले नाते, उरली न कुणाची
कां, छळियले मज नाना प्रकारी....?
अहं सर्व, अहं ब्रम्‍ह
असा कसा हा गुण मानवाचा....?
जरी पराधीन आहे,जगती जन्‍म मानवाचा......
राहुल उज्‍जैनकर 'फ़राज़'

Tuesday, October 16, 2012

मै तुम्हे ढूंढने, स्वर्ग के द्वार तक..


मै तुम्हे ढूंढने, स्वर्ग के द्वार तक...!
रोज़ जाता रहा , रोज़ आता रहा...!!

तुम गज़ल बन गई, गीत में ढल गई...!
मंच से मै तुम्हे गुनगुनाता रहा...!!
(Base Line Pickup from Dr. Kumar Vishwas ji...)

तुम संवेदना शून्‍य बनकर मेरे भावों को छलती रही
मैं अपनें ही रक्‍त से तुम पर प्रेम गान लिखता रहा ..........

तुम्‍हारी प्रेम तृष्‍णा में, मैं याचक से चातक बना
स्‍वाती नक्षत्र सा प्रेम तुम्‍हारा, मैं बस बाट जोहता रहा........

मेरे ह्रदय के करूण कृंदन से हो न जाओ विचलित कही
श्‍ाब्‍दों से गीतों में परिवर्तित कर तम्‍हे, गुनगुनाता रहा...............
राहुल उज्‍जैनकर 'फ़राज़

Friday, March 02, 2012

हे सगळं विसरतां येईल कां ?


तुझे ते गोड हासणे 
तो नखरा, ते धावपळी चे खेळ 
तुझे ते हसतां-हसतां रडणे 
मग माझे हात 
तुझया डोळया पुढे येताच  
तुझे  ते गोड हासणें  
त्‍या उंच आकाशाच्‍या गोष्‍टी 
ते समुद्राकाठी घालवलेले 
कित्‍येक तास 
त्‍या मावळत्‍या सूर्या कडे 
एकटक पाहत राहणे 
अगं, हे सगळं विसरतां येईल कां ?
आज आपल्‍याला 
वेगळे होवून 
कित्‍येक वर्षे झाली आहे 
पण ................
अजुनही असेच वाटते 
की 
जशी कालचीच गोष्‍ट होती  
तू धावत आलीस  
अन् 
आपण समुद्राकाठी गेलो 
तू रडत होतीस 
कारण .........
वडिलांची बदली झाली होती 
तुझया 
आज शेवटची भेट होती 
तुझी 
माझी 
असाही दिवस येईल
कधी कल्‍पना सुध्‍दा केली नव्‍हती  
आपल्‍या प्रेमाच्‍या पाखरांना 
पंख सुध्‍दा फुटले नव्‍हते 
पण .......
नियती पुढे कोणाची चालली आहे 
आज ............... 
तुझा लग्‍न समारंभ 
सुखाने पार पडलां असेल  
शेवटदा तुला पहायचं होतं 
पण ...............
धाडस झालं नाही माझं 
अगं 
मी मनाचा ऐवढा मोठा नाहीये 
मला, त्‍या पूर्ण न झालेल्‍या स्‍वप्‍नांचा 
आज ही, हेवा वाटतोयं 
हे सगळं विसरतां येईल कां ?
अगं, हे सगळं विसरतां येईल कां ?

कल्‍पना व संवादः राहुल उज्‍जैनकर ''फराज'' 

Thursday, March 01, 2012

दिवस असे का प्रेमाचे हे ..................


दिवस असे का प्रेमाचे ह, सहजा सहजी फिरून जातात 
हवे हवे से दिवस हे, हवेत का विरून जातात 
हवे हवे से दिवस हे, हवेत का विरून जातात
 शोधल्‍यावर ही मिळत नाही, उरतात फक्‍त आठवणीं
आठवणीं मागचे स्‍वप्‍न ते, वेडे का करून जातात 
हवे हवे से दिवस हे, हवेत का विरून जातात
कित्‍येक वर्षे मागे गेली, तरी तें आठवावंस वाटतं 
ते, दिवस आठवता मात्र - डोळे का भरून जातात 
हवे हवे से दिवस हे, हवेत का विरून जातात
आज आपण एक आहोत, काल भेटूं ही देत नव्‍हते 
प्रेमाशी कुणाचे वैर आहे ? , लोकं असे कां करून जातात 
हवे हवे से दिवस हे, हवेत का विरून जातात
राहुल उज्जैनकर ''फराज'' 
I Strongly Believe, that this is my one of the Best Poetry Ever...
 

नशीबाशी आज पुन्‍हा.........


नशीबाशी आज पुन्‍हा, लढण्‍याची इच्‍छा झाली  

नशीबाशी आज पुन्‍हा, लढण्‍याची इच्‍छा झाली  
अर्ध्‍या रात्री मला तुझयाशी भेटण्‍याची इच्‍छा झाली 
नशीबाशी आज पुन्‍हा,
भेंट जर झाली नाही तर सर्व काही पेटवून देईन 
भर पावसाळयात मला आग लावण्‍याची इच्‍छा झाली 
नशीबाशी आज पुन्‍हा,
दिवा म्‍हणतो काही झालं तरी आज विझणार नाही 
दिव्‍यालाही वारयाशी आज लढण्‍याची इच्‍छा झाली 
नशीबाशी आज पुन्‍हा,
वाट पाहत बसला, की ह्रदयातला कवि जागा होतो 
 तुझयासाठी शब्‍दांना आज गुंफण्‍याची इच्‍छा झाली 
 नशीबाशी आज पुन्‍हा,
अश्रु-डोळयात माझया आणि ओठांवर विरहाचे गीत 
वेडा होवून दारो-दारी तुला शोधण्‍याची इच्‍छा झाली 
 नशीबाशी आज पुन्‍हा,
राहुल उज्‍जैनकर ''फराज'' 

प्यार वफ़ा इश्क की बातें, तुम करोगे ?प्यार वफ़ा इश्क की बातें, तुम करोगे ?

प्यार वफ़ा इश्क की बातें, तुम करोगे ? इमानो दिल,नज़ीर की बातें तुम करोगे ? तुम, जिसे समझती नही, दिल की जुबां मेरी आँखों मे आँखें डाल,बातें तुम...